Posts
Showing posts from 2024
*राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयात आज दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष,शिवसेना नेते, मा.खासदार चंद्रकांतजी खैरे तर प्रमुख पाहुणेपदी माजी महापौर नंदकुमार घोडेले, शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे, प्रेरणाताई खैरे आरलकट्टी, मुक्ताताई खैरे यांच्यासह प्राचार्य ऋषिकेश पाटील, माजी सैनिक सुभेदार नामदेव सावंत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे अध्यक्ष, मा.खा.चंद्रकांतजी खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी सैनिकी शाळेच्या सैनिक विद्यार्थ्यांकडून व एनसीसी प्लाटून यांनी सैनिकी पथसंचलन करून ध्वजास मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहणानंतर स्कूल कॅप्टन अभिषेक गावित व ग्रुप कमांडर राहुल ठाकरे यांच्या हस्ते मा.चंद्रकांतजी खैरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत दि. 13 ऑगस्ट रोजी शाळेचे प्राचार्य ऋषिकेश पाटील यांच्या हस्ते तर दि. 14 ऑगस्ट रोजी शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.चंद्रकांतजी खैरे यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंगी राष्ट्रभक्ती व देशप्रेम अंगीकारत समाजात आदर्श नागरिक म्हणून जगावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे व प्राचार्य ऋषिकेश पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत भाषणे सादर केली. सदर कार्यक्रमातील सैनिकी पथसंंचलन व परेड कमांडिंगसाठी सैनिकी विभागाचे दत्तात्रय लोखंडे, सखाराम गायके, मनोहर परसे, अनिल जगताप यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत केंद्रे यांनी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. हरि कोकरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती मनीषा पाटील, सुरेखा जैन, अनिता शितोळे, प्रतिभा महाजन, गायत्री चव्हाण, अर्चना स्वामी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
- Get link
- X
- Other Apps
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट तीन दिवस संपूर्ण भारत देशामध्ये "ध्वजारोहण" महोत्सव साजरा केला जात आहे. सैनिकी शाळेतही ध्वजारोहण करून विद्यार्थी परेड संचलनाने ध्वजाला मानवंदना दिली. यानिमित्ताने शाळेत विविध उपक्रम, विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आज ध्वजारोहण नंतर लगेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला मा. सचिन भाऊ खैरे, प्राचार्य श्री. पाटील सर, डॉ. हरी कोकरे सर, श्रीमती मनिषा पाटील मॅडम,सैनिकी विभाग प्रमुख श्री. दत्ताभाऊ लोखंडे सर, कॅप्टन श्री.मुंडे सर उपस्थित होते. श्रीमती पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्रीमती शितोळे मॅडम, व श्री. सुर्यवंशी सर यांनी केले. सुत्रसंचलन श्रीमती पाटील मॅडम, तसेच श्री केंद्रे सर यांनी केले. सर्व शिक्षक, विद्यार्थी, उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तीन दिवसीय महोत्सवानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी आजचा दुसरा दिवस. या प्रसंग शालेय समिती अध्यक्ष प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद
- Get link
- X
- Other Apps
आज राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय कांचनवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात सर्व विद्यार्थ्यांची तपासणी व औषधोपचार देण्यात आले.
- Get link
- X
- Other Apps
*राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेतील मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डने सन्मानित* जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील यांना इंडियन टॅलेंट ओलंपियाड तर्फे बेस्ट प्रिन्सिपल अवार्ड घोषित करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशपातळीवरील संपूर्ण शाळांमधून सर्वोत्तम १००० शाळेच्या मुख्याध्यापकांना सदर अवार्ड दिला जातो. राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत ऋषिकेश पाटील मागील 26 वर्षांपासून गणित विषयाचे उत्कृष्ट अध्यापनासह मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने सैनिकी शाळेतील असंख्य विद्यार्थी सैन्य दलासह इतर विविध पदावर कार्यरत आहेत. सैनिकी शाळेत विविध स्पर्धा परीक्षा सोबतच इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड मार्फत घेण्यात येणार्या सर्व विषयांच्या स्पर्धा परीक्षा, एनडीए तसेच शालेय शिष्यवृत्ती परीक्षा सह अनेक स्पर्धा परीक्षा होतात. सदर परीक्षा सैनिकी शाळेतील स्पर्धा परीक्षा प्रमुख श्री.संजय बनकर हे मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने दरवर्षी राबवित असतात. या संपूर्ण परीक्षेतील सहभागी विद्यार्थी व परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आलेखावर देश पातळीवर सैनिकी शाळेला या पुरस्काराच्या अनुषंगाने सन्मानित करण्यात येत आहे. मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील यांना बेस्ट प्रिन्सिपल अवार्ड मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे, सचिव जयप्रकाशजी गुदगे, शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
- Get link
- X
- Other Apps
सैनिकी शाळेचे शिक्षण निदेशक श्री सावंत सर यांचा सेवापुर्ती निमित्त निरोप समारंभ
- Get link
- X
- Other Apps
सैनिकी शाळेचे प्राचार्य श्री ऋषिकेश पाटील सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देताना सर्व शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी
- Get link
- X
- Other Apps
छ.संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
- Get link
- X
- Other Apps
*राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा* जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आज दि.1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष सचिनभाऊ खैरे तर प्रमुख पाहुणेपदी समाजसेवक डॉ.संजय सुर्वे यांच्यासह प्राचार्य ऋषिकेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. हरी कोकरे, सैनिकी विभाग प्रमुख सुभेदार नामदेव सावंत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे डॉ. संजय सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजास मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहणानंतर डॉ. संजय सुर्वे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास सैनिकी शाळेचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
✨🌹🙏🏻जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे संविधान निर्माते, क्रांतीसुर्य, विश्वरत्न, बोधीसत्व, बहुजन उद्धारक,परमपूज्य, महामानव.. ✨*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर* ✨ यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये आज रोजी शाळेचे प्राचार्य श्री पाटील एच. एल. सर , सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री डॉ. कोकरे सर, एनसीसी प्रमुख श्री मुंडे सर सैनिकी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शाळेचे मराठी शिक्षक श्री सूर्यवंशी सर यांनी शाळेला भारताची राज्यघटना श्री पाटील सरांना शाळेतील मुलांच्या वाचनासाठी सप्रेम भेट म्हणून दिले ..🙏🏻🌹✨
- Get link
- X
- Other Apps
दि.११एप्रिल२४ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सैनिकी शाळेत त्त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शाळेचे प्राचार्य व शिक्षक वृंद.
- Get link
- X
- Other Apps
विज्ञान विभागामार्फत घेण्यात आलेल्या दि 28 फेब्रुवारी रोजीच्या म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन दिवसाच्या कार्यक्रमातील भाषणांवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा देण्यात आली होती त्या स्पर्धेतील निकालाचे बक्षीस वितरण सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेचे प्राचार्य व विज्ञान विभागाचे सर्व शिक्षक व प्राध्यापक यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले श्री मुंडे सरांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली श्री मुंडे सरांनी याप्रसंगी सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ हरी कोकरे सर श्रीमती शितोळे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षकवृंद याप्रसंगी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या वतीने गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित नमो चषक-2024 क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण "श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था" औरंगपूरा ,येथे करण्यात आले त्यात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी खो-खो स्पर्धेत 14 वयोगट, 17 वयोगट प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले,व कबड्डी स्पर्धेत 14 वयोगट द्वितीय क्रमांक व 17 वयोगट तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ( ट्रॉफी) देऊन आपल्या शाळेच्या खेळाडूंना गौरवण्यात आले.
- Get link
- X
- Other Apps