Skip to main content
*राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेतील मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डने सन्मानित* जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील यांना इंडियन टॅलेंट ओलंपियाड तर्फे बेस्ट प्रिन्सिपल अवार्ड घोषित करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशपातळीवरील संपूर्ण शाळांमधून सर्वोत्तम १००० शाळेच्या मुख्याध्यापकांना सदर अवार्ड दिला जातो. राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत ऋषिकेश पाटील मागील 26 वर्षांपासून गणित विषयाचे उत्कृष्ट अध्यापनासह मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने सैनिकी शाळेतील असंख्य विद्यार्थी सैन्य दलासह इतर विविध पदावर कार्यरत आहेत. सैनिकी शाळेत विविध स्पर्धा परीक्षा सोबतच इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड मार्फत घेण्यात येणार्या सर्व विषयांच्या स्पर्धा परीक्षा, एनडीए तसेच शालेय शिष्यवृत्ती परीक्षा सह अनेक स्पर्धा परीक्षा होतात. सदर परीक्षा सैनिकी शाळेतील स्पर्धा परीक्षा प्रमुख श्री.संजय बनकर हे मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने दरवर्षी राबवित असतात. या संपूर्ण परीक्षेतील सहभागी विद्यार्थी व परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आलेखावर देश पातळीवर सैनिकी शाळेला या पुरस्काराच्या अनुषंगाने सन्मानित करण्यात येत आहे. मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील यांना बेस्ट प्रिन्सिपल अवार्ड मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे, सचिव जयप्रकाशजी गुदगे, शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment