Skip to main content
*राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा* जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आज दि.1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष सचिनभाऊ खैरे तर प्रमुख पाहुणेपदी समाजसेवक डॉ.संजय सुर्वे यांच्यासह प्राचार्य ऋषिकेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. हरी कोकरे, सैनिकी विभाग प्रमुख सुभेदार नामदेव सावंत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे डॉ. संजय सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजास मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहणानंतर डॉ. संजय सुर्वे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास सैनिकी शाळेचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment