Skip to main content
* राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न...* आज दि. २६ जानेवारी "प्रजासत्ताक दिनानिमित्त" राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत संस्थेचे अध्यक्ष मा. खा. चंद्रकांत खैरे साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री. सचिन भाऊ खैरे, प्राचार्य श्री. पाटील सर, श्री. पी. आर. जाधव सर, एन. सी. सी. प्रमुख श्री. मुंडे सर, डॉ. श्री. कोकरे सर, श्री. सावंत सर, श्रीमती जैन मॅडम, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मा. साहेबांनी विद्यार्थ्यांचे परेड निरिक्षण केले, त्यानंतर विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून साहेबांना मानवंदना दिली.त्यानंतर साहेबांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.प्रजासत्ताक दिनानिमित्त साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी लेझीम तालीम उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यानंतर प्राचार्य श्री. पाटील सर याचे भाषण झाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय बनकर सरांनी केले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment