Skip to main content
राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.... सुरूवातीला माॅसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. पाटील सर होते. तर मंचावर श्री.मुंडे सर , श्रीमती पाटील मॅडम, श्री. बनकर सर उपस्थित होते. श्रीमती पाटील मॅडम यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्य व विचार यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री. संजय बनकर सरांनी केले. यावेळी विद्यार्थ्यी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment