Posts

Showing posts from January, 2023

* राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न...* आज दि. २६ जानेवारी "प्रजासत्ताक दिनानिमित्त" राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत संस्थेचे अध्यक्ष मा. खा. चंद्रकांत खैरे साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री. सचिन भाऊ खैरे, प्राचार्य श्री. पाटील सर, श्री. पी. आर. जाधव सर, एन. सी. सी. प्रमुख श्री. मुंडे सर, डॉ. श्री. कोकरे सर, श्री. सावंत सर, श्रीमती जैन मॅडम, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मा. साहेबांनी विद्यार्थ्यांचे परेड निरिक्षण केले, त्यानंतर विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून साहेबांना मानवंदना दिली.त्यानंतर साहेबांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.प्रजासत्ताक दिनानिमित्त साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी लेझीम तालीम उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यानंतर प्राचार्य श्री. पाटील सर याचे भाषण झाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय बनकर सरांनी केले.

Image
 

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

Image
 

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मध्ये 23 जानेवारी माननीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात वर्ग आठवी ते बारावी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला

Image
 

आज दिनांक 14 जानेवारी रोजी जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव श्री जयप्रकाशजी गुदगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा व भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते

Image
 

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.... सुरूवातीला माॅसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. पाटील सर होते. तर मंचावर श्री.मुंडे सर , श्रीमती पाटील मॅडम, श्री. बनकर सर उपस्थित होते. श्रीमती पाटील मॅडम यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्य व विचार यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री. संजय बनकर सरांनी केले. यावेळी विद्यार्थ्यी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Image
 

*खो-खो खेळाडूंना स्पोर्ट्स कीटचे वाटप.* काल दि. ९ जानेवारी रोजी 14,17,19 वर्षआतील खेळाडू संघाला स्पोर्ट्स कीटचे वाटप वाटप करण्यात आले. आमचे प्रेरणास्थान ज. म. शि. प्र. सं. अध्यक्ष शिवसेना नेते मा. खा. चंद्रकांत खैरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्पोर्ट्स कीटचे वाटप करण्यात आले. शालेय समिती अध्यक्ष मा. सचिन भाऊ खैरे तसेच प्राचार्य श्री पाटील सर यांच्या शुभहस्ते या कीटचे वाटप करण्यात आले. 14 वर्षआतील खेळाडूंना श्री.संजय बनकर सर यांच्या वतीने स्पोर्ट्स कीट देण्यात आले. यावेळी श्री. सावंत सर, श्री, नंदन सर, श्री, अनिल जगताप सर उपस्थित होते.

Image
 
Image
 
Image
 
Image
 

मा.खा. चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिडा्स्पर्धेला पदवीधर आमदार सतिशजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते मशाल पेटवून उद्घाटन झाले याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर.

Image
 
Image
 
Image