Posts

Showing posts from 2022
Image
 

दि.13डिसेंब22 रोजी IMO (आँलंपियाड गणित)ची परिक्षा पार पडली यावेळी प्राचार्य श्री पाटील सर,श्री धोत्रे सर, श्री रगडे सर व स्पर्धा परीक्षा प्रमुख श्री बनकर सर उपस्थित होते.

Image
 

*मनपा हद्दीतील जिल्हास्तरीय शालेय खोखो स्पर्धेला सुरुवात* जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या मनपा हद्दीतील शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेला आज राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेच्या क्रीडांगणावर सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र खो खो संघटनेचे सचिव गोविंदजी शर्मा व जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेचे शालेय समिती अध्यक्ष सचिनभाऊ खैरे यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी प्रमुख पाहुणेपदी शाळेचे मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. हरी कोकरे,एन.सी.सी ऑफिसर अरुण मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेचे उदघाटक गोविंद शर्मा व सचिनभाऊ खैरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात व खोखो क्रीडांगणावर श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी सैनिकी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख एन.जी. सावंत,स्पर्धाप्रमुख मोहन अहिरे जिल्हा खोखो संघटनेचे पदाधिकारी दीपक सपकाळ,सहसचिव अभय नंदन सर आदींनी परिश्रम घेतले.

Image
 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या शालेय ग्रामीणच्या जिल्हास्तरीय खो खो (मुले ) स्पर्धेला आज राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेच्या क्रीडांगणावर सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धेचे उदघाटन सैनिकी शाळेचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.हरी कोकरे व एन.सी.सी प्रमुख श्री.अरुण मुंढे सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणेपदी शाळेचे मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील सर,जिल्हा खो खो संघटनेचे खजिनदार श्रीपाद लोहकरे यांची उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेचे उदघाटक मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात व खो खो क्रीडांगणावर श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

Image
 

जगन्माता शारदा वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व स्पर्धेचे आयोजक श्री SPजवळकर सर,मान्यवर व शाळेचे श्री बनकर सर.

Image
 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री पाटील सर , श्री कोकरे सर ,श्री मुंडे सर, व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. आजचे व्याख्याते श्री संजय बनकर (शाळेचे सहशिक्षक) हे होते.

Image
 

सकाळ दि.४/१२/२२शाळेची बातमी

Image
 

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचे शालेय समिती अध्यक्ष मा.श्री सचिन भाऊ खैरे यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री पाटील सर व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Image
 
Image
 

जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.जयप्रकाशजी गुदगे साहेब, महापौर श्री घोडले साहेब, शालेय समिती अध्यक्ष मा.श्री सचिन भाऊ खैरे,मा.मु.श्री.पाटील सर यांच्या हस्ते आजपासून सोलार सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली व संपूर्ण वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सुविधा उपलब्ध झाली.(दि.२८/११/२२)

Image
 

जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालय यांचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी सर्व शिक्षकांना डॉ. सविता मुळे मॅडम यांच्या दुबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद व शाळेच्या ग्रंथालय व संगणक कक्षाचे बांधकाम उद्घाटन प्रसंगी मा.महापौर श्री .घोडेले साहेब व संस्थेचे सचिव माननीय श्री जयप्रकाशजी गुदगे उपस्थित होते .यावेळी शाळेचे प्राचार्य श्री पाटील सर, शालेय समिती अध्यक्ष श्री. सचिन भाऊ खैरे, दादोजी कोंडदेव विद्यालयाचे प्राचार्य श्री चव्हाण सर उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. चंद्रकांतजी खैरे साहेब यांनीही शुभेच्छा दिल्या.

Image
 

क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शाळेत अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Image
 

देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती शाळेत साजरा करण्यात आली

Image
 

शाळेचे शिक्षक श्री जगताप सर, कर्मचारी श्री.बंडू काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शा.स. अध्यक्ष श्री सचिन भाऊ खैरे ,प्राचार्य श्री पाटील सर, व इतर सहकारी.

Image
 

दिनांक 14 ऑक्टोबर रोजी शाळेत ओलंपियाड परीक्षेचे (IEO )आयोजन करण्यात आले होते त्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Image
 

💐 *फिट इंडिया फ्रीडम - रन ३.० उपक्रम* 💐 काल दि.१४/१०/२०२२ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालय औरंगाबाद आणि राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ(विज्ञान) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने *फिट इंडिया फ्रीडम - रन ३.०* हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

Image
 

काल दि.३० सप्टेंबर २०२२ रोजी आपल्या राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत शालेय समिती अध्यक्ष आदरणीय सचिनभाऊ खैरे यांच्या हस्ते सुसज्ज कबड्डी क्रीडांगणाचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणेपदी भारतीय सैन्य दलातील आर्टलरी बिग्रेडचे कार्यरत सेक्टर कमांडर हवालदार मेजर श्री.पाटील साहेब, जिल्हा कबड्डी प्रशिक्षक श्री.डॉ.माणिक राठोड सर,प्राचार्य पाटील सर उपस्थित होते.यावेळी शाळेतील सैनिकी विभागाचे जाधव सर,सावंत सर,जगताप सर तसेच काराजंगी सर,अहिरे सर,काशिद सर,क्षीरसागर सर,नंदन सर आणि सैन्य दलातील कार्यरत खेळाडू सैनिक व शाळेचे खेळाडू विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Image
 

दि.१७ सप्टें.२२ रोजी शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी माननीय महापौर व प्राचार्य आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Image
 

खो खो स्पर्धे सर्वप्रथम

Image
🌹 * हार्दिक अभिनंदन.. * 🌹 * आज श्री.सरस्वती भुवन प्रशाला  संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. * * या स्पर्धेत आपल्या राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेच्या १४ वर्षाखालील संघाने स्पर्धेत प्रथम  क्रमांक पटकावत स्पर्धा जिंकली. * * सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन... * 💐💐💐💐💐💐💐💐💐  

आज सैनिकी शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री सचिन भाऊ खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या याप्रसंगी मा.सचिन भाऊ खैरे प्राचार्य श्री. पाटील सर ,श्री कोकरे सर व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी.

Image