sainiki school


Comments

  1. Sir hum ko bhi ana ha plz contact me 9975579375 this is my number

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

*राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयात आज दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष,शिवसेना नेते, मा.खासदार चंद्रकांतजी खैरे तर प्रमुख पाहुणेपदी माजी महापौर नंदकुमार घोडेले, शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे, प्रेरणाताई खैरे आरलकट्टी, मुक्ताताई खैरे यांच्यासह प्राचार्य ऋषिकेश पाटील, माजी सैनिक सुभेदार नामदेव सावंत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे अध्यक्ष, मा.खा.चंद्रकांतजी खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी सैनिकी शाळेच्या सैनिक विद्यार्थ्यांकडून व एनसीसी प्लाटून यांनी सैनिकी पथसंचलन करून ध्वजास मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहणानंतर स्कूल कॅप्टन अभिषेक गावित व ग्रुप कमांडर राहुल ठाकरे यांच्या हस्ते मा.चंद्रकांतजी खैरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत दि. 13 ऑगस्ट रोजी शाळेचे प्राचार्य ऋषिकेश पाटील यांच्या हस्ते तर दि. 14 ऑगस्ट रोजी शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.चंद्रकांतजी खैरे यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंगी राष्ट्रभक्ती व देशप्रेम अंगीकारत समाजात आदर्श नागरिक म्हणून जगावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे व प्राचार्य ऋषिकेश पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत भाषणे सादर केली. सदर कार्यक्रमातील सैनिकी पथसंंचलन व परेड कमांडिंगसाठी सैनिकी विभागाचे दत्तात्रय लोखंडे, सखाराम गायके, मनोहर परसे, अनिल जगताप यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत केंद्रे यांनी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. हरि कोकरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती मनीषा पाटील, सुरेखा जैन, अनिता शितोळे, प्रतिभा महाजन, गायत्री चव्हाण, अर्चना स्वामी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य श्री.पंढरिनाथ गोंडेपाटील सर यांना नियुक्ती पत्र देताना संस्थेचे सचिव मा.श्री .जयप्रकाशजी गुदगे, महापौर मा.श्री नंदकुमार घोडेले ,माजी मुख्याध्यापक श्री मिटकरी सर व शिक्षक वृंद.