Posts
Showing posts from March, 2024
विज्ञान विभागामार्फत घेण्यात आलेल्या दि 28 फेब्रुवारी रोजीच्या म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन दिवसाच्या कार्यक्रमातील भाषणांवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा देण्यात आली होती त्या स्पर्धेतील निकालाचे बक्षीस वितरण सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेचे प्राचार्य व विज्ञान विभागाचे सर्व शिक्षक व प्राध्यापक यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले श्री मुंडे सरांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली श्री मुंडे सरांनी याप्रसंगी सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ हरी कोकरे सर श्रीमती शितोळे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षकवृंद याप्रसंगी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या वतीने गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित नमो चषक-2024 क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण "श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था" औरंगपूरा ,येथे करण्यात आले त्यात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी खो-खो स्पर्धेत 14 वयोगट, 17 वयोगट प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले,व कबड्डी स्पर्धेत 14 वयोगट द्वितीय क्रमांक व 17 वयोगट तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ( ट्रॉफी) देऊन आपल्या शाळेच्या खेळाडूंना गौरवण्यात आले.
- Get link
- X
- Other Apps