Posts

Showing posts from February, 2023
Image
 

*खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये राहुल पवारला सुवर्णपदक* *5वी खेलो इंडिया युथ गेम्स 2023 राष्ट्रीय स्पर्धा* नुकतीच मध्य प्रदेश येथील जबलपूर येथे संपन्न झाली. यामध्ये देशभरातील 29 विविध खेळांद्वारे 6000 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र मुलांच्या खो-खो संघात राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचा माजी विद्यार्थी सचिन पवार याची निवड करण्यात आली. आज दि. 3 फेब्रुवारी रोजी खेलो इंडिया युथ गेम्स अंतर्गत राष्ट्रीय खो खो स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला, हा सामना महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली यांमध्ये खेळला गेला. या सामन्यामध्ये महाराष्ट्राने दिल्लीला कडवी झुंज देत 5 गुणांनी रोमहर्षक विजय मिळवून अजिंक्यपद पटकावत सुवर्णपदक प्राप्त केले. या महाराष्ट्र संघात राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचा माजी विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू कु.सचिन पवार याचाही समावेश होता. सचिनने अंतिम सामन्यात 1.75 मिनिटे संरक्षण करीत महाराष्ट्राला विजयश्री मिळवून दिला. विशेषतः सचिनला हाताला दुखापत झाली असल्यानंतरही तो आपल्या संघासाठी उत्तम खेळला. महाराष्ट्र संघात सचिन पवार याने उत्कृष्ट खेळ करून राज्याला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली, यावेळी संपूर्ण संघासह सचिन यासही सुवर्णपदक मिळाले. त्याच पार्श्वभूमीवर त्याच्या या यशाबद्दल जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष शिवसेना नेते मा. खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब, संस्थेचे सचिव जयप्रकाशजी गुदगे, शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे, प्राचार्य ऋषिकेश पाटील तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा, ऑल इंडिया खो-खो फेडरेशनचे सचिव चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो खो संघाचे प्रशिक्षक व मार्गदर्शक संजय मुंढे, औरंगाबाद खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष समीर मुळे, सचिव विकास सूर्यवंशी, सहसचिव अभय नंदन आदींसह सैनिकी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडा क्षेत्रातील क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले.

Image