Posts
Showing posts from December, 2022
दि.13डिसेंब22 रोजी IMO (आँलंपियाड गणित)ची परिक्षा पार पडली यावेळी प्राचार्य श्री पाटील सर,श्री धोत्रे सर, श्री रगडे सर व स्पर्धा परीक्षा प्रमुख श्री बनकर सर उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
*मनपा हद्दीतील जिल्हास्तरीय शालेय खोखो स्पर्धेला सुरुवात* जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या मनपा हद्दीतील शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेला आज राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेच्या क्रीडांगणावर सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र खो खो संघटनेचे सचिव गोविंदजी शर्मा व जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेचे शालेय समिती अध्यक्ष सचिनभाऊ खैरे यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी प्रमुख पाहुणेपदी शाळेचे मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. हरी कोकरे,एन.सी.सी ऑफिसर अरुण मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेचे उदघाटक गोविंद शर्मा व सचिनभाऊ खैरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात व खोखो क्रीडांगणावर श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी सैनिकी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख एन.जी. सावंत,स्पर्धाप्रमुख मोहन अहिरे जिल्हा खोखो संघटनेचे पदाधिकारी दीपक सपकाळ,सहसचिव अभय नंदन सर आदींनी परिश्रम घेतले.
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या शालेय ग्रामीणच्या जिल्हास्तरीय खो खो (मुले ) स्पर्धेला आज राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेच्या क्रीडांगणावर सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धेचे उदघाटन सैनिकी शाळेचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.हरी कोकरे व एन.सी.सी प्रमुख श्री.अरुण मुंढे सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणेपदी शाळेचे मुख्याध्यापक ऋषिकेश पाटील सर,जिल्हा खो खो संघटनेचे खजिनदार श्रीपाद लोहकरे यांची उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेचे उदघाटक मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात व खो खो क्रीडांगणावर श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
- Get link
- X
- Other Apps
जगन्माता शारदा वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व स्पर्धेचे आयोजक श्री SPजवळकर सर,मान्यवर व शाळेचे श्री बनकर सर.
- Get link
- X
- Other Apps
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री पाटील सर , श्री कोकरे सर ,श्री मुंडे सर, व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. आजचे व्याख्याते श्री संजय बनकर (शाळेचे सहशिक्षक) हे होते.
- Get link
- X
- Other Apps